९ गुंठे जागेत शिवस्मारक तर उर्वरित ९ गुंठे जागेत स्थानिक व्यावसायिकाचे पुनर्वसन

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी काढला तोडगा

*⚡कणकवली ता.१६-: कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पंचायत समिती लगतच्या १८ गुंठे शासकीय जागेत स्थलांतरित करीत असतानाच ९ गुंठे जागा शिवस्मारकासाठी तर उर्वरित ९ गुठे जागेत स्थानिक व्यावसायिकाच्या पुनर्वसनासाठी वापरण्याचा प्रस्ताव पालकमंत्री नाम.उदय सामंत यांनी ठेवला .

या जागेची १९ जानेवारीला मोजणी केली जाईल . यासाठी व्यावसायिकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करताना कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही . रितसर नगरपंचायतीच्या माध्यमातून पुनर्वसन केले जाईल असा शब्द पालकमंत्र्यांनी स्थानिक व्यावसायिकांना दिला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराबाबत गेले काही दिवस हालचाली सुरु आहेत. सकल मराठा समाज, छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाच्यावतीने पुतळा स्थलांतरासाठी पंचायत समितीच्या लगतची ५०० स्वेअर फूट जागा मागितली होती . त्यानंतर ओरोस येथे झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी त्याच जागी पुतळा स्थलांतर करायचे असेल तर शासनाची सर्वच १८ गुंठे जागेची मोजणी करा , असे निर्देश दिले होते .

या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी पालकमंत्री ना.उदय सामत यांनी मराठा समाजाचे कार्यकर्ते तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ ,शिवप्रेमी, त्याचप्रमाणे स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधता .यावेळी निवासी जिल्हाधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार रमेश पवार , कणकवली नगरपंचायतीचे किशोर धुमाळे ,भूमि अभिलेखचे श्री. परब , पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर व अन्य अधिकारी , त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत , शिवसेना नेते संदेश पारकर , शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक संचालक नगरसेवक सुशांत नाईक , शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले , नगरसेवक कन्हैया पारकर ,भाई परब , महेंद्र सांब्रेकर, ज्ञानेश्वर दीपनाईक , सुशील सावंत , शेखर राणे , बच्चू प्रभुगावकर , संदीप सावंत , सुशांत दळवी , समीर परब, राजू राणे, मनोज हिर्लेकर,चेतन मुंज , विशाल साटम , राजेंद्र चव्हाण, सुंदर चव्हाण , बाळा म्हापसेकर, श्री. धामापूरकर , श्री. परब अन्य उपस्थित होते. यावेळी पुतळा स्थलांतर बाबत बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी ९ गुंठे जागेत शिवस्मारक उभारणी करावी व ९ गुंठे जागेत स्थानिक व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव ठेवला . यासाठी स्थानिकांची बैठक घेतली जाईल तसेच आम.नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी चर्चा केली जाईल असे सांगतानाच सदरच्या जागेची मोजणी १९ जानेवारी करावी अशी सूचना अधिकाऱ्यांना केली . तसेच व्यावसासिकांच्या जागेची मोजणी करावी अशा सूचना करतानाच कुणाचेही नुकसान होणार याची खबरदारी घेतली जाईल . पुनर्वसना करताना अधिकृतरीत्या पुनर्वसन असेल अशा शब्द दिला . त्यामुळे स्थानिकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी , कोणत्याही स्थितीत शिवस्मारक देखण्या स्वरुपात उभे रहावे यासाठी आमचे प्रयत्न असून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. आपण या पुतळ्याच्या स्थलांतराबाबत डेटलाइन एवढ्यासाठी दिली. लोकांचे नुकसान होऊ नये हीच भूमिका माझी होती. पालकमंत्री म्हणून काम करत असताना जशी इतरांना रोजीरोटीची काळजी आहे तसाच प्रश्न माझ्या डोळ्यासमोर देखील आहे. मी यायचं आणि अतिशहाणपणा करायचा आणि सगळं पाडून टाक म्हणून सांगायच असं वागणारा मी नाही आणि म्हणून चार वेळेस आलो तरी चालेल कुणी टीका केली तरी चालेल अशा टीकेकडे लक्ष देणार नाही. असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

You cannot copy content of this page