काजरकोडं येथील बागेत सापडला एका व्यक्तीचा मृतदेह

सावंतवाडी-: कोलगाव काजरकोंड येथील एका बागे मध्ये एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, त्या व्यक्तीचे नाव सुरेश विष्णु राऊळ रा. नेमळे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कोलगाव येथे तो आपल्या बहिणीकडे राहत होता. तर आपल्या उदरनिर्वाहासाठी फुल विक्रेत्यांना लागणारी पाने काढून देत होता. गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असल्याने त्याची शोधाशोध देखील सुरू होती. परंतु आज गुरुवारी सायंकाळी काजर कोडं येथील नाईक बागेत त्याचा मृतदेह सापडला आहे. तो बेपत्ता असल्याची कोणतीही खबर पोलिसात देण्यात आली नसल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे.

You cannot copy content of this page