Headlines

आचरा जेष्ठ नागरिक संघाच्या युवा गौरव पुरस्काराने निलेश सरजोशी सन्मानित

*💫मालवण दि.३१-:* आचरा जेष्ठ नागरिक सेवा संघातर्फे जाहीर झालेला युवा गौरव पुरस्कार निलेश सरजोशी यांना प्रदान करण्यात आला. आचरे पंचक्रोशीसाठी त्यांनी दिलेले योगदान, सामाजिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे असलेले कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आचरा जेष्ठ नागरिक सेवासंघाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी वैदेही सरजोशी, जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर, अशोक कांबळी, सुरेश गावकर, फर्नांडिस, अरुंधती कांबळी, प्रकाश पेडणेकर, पांडुरंग वायंगणकर,गोपाळ परब, बाजेल फर्नाडिस व अन्य जेष्ठ नागरीक सेवासंघाचे सदस्य उपस्थित होते. पुरस्कार प्रदान करताना आचरा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे म्हणाले की आमच्या संस्थेचा “युवा गौरव पुरस्कार २०२०” प्रदान करीत असताना आम्हा सर्व जेष्ठांना अत्यानंद होत आहे. गेली वीस वर्षे एक युवक म्हणून निलेश सारजोशी यांनी आचरे पंचक्रोशीसाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. केवळ ज्येष्टांसाठीच नाही तर सर्वसामान्य माणसांसाठीचे सरजोशी यांचे योगदान फार मोलाचे आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे! त्रिनेत्र मित्रमंडळ, आचरा बाळ सरजोशी चैरिटेबल ट्रस्ट , श्री रामेश्वर प्रासादिक नाट्यसमाज , दि आचरा कॅैरम अॅण्ड चेस असो., नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडियम स्कूल आचरा आदी अनेक संस्थांच्या सहकार्याने त्यांनी केलेले सामाजिक कार्य, त्यांनी आयोजित केलेली अनेक रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे, विविध वयोगटांसाठी स्पर्धा, योग शिबीरे यांच्या माध्यमातून समाजाच्या व्यक्तिमत्व विकासास हातभार लागला आहे. विविध विषयांचे प्रशिक्षण वर्ग, व्यायाम शाळा, हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक आदींच्या माध्यमातून केलेली समाजसेवा गौरवास्पद असल्याने त्यांची निवड या पुरस्कारासाठी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page