*⚡मालवण ता.०६-:* जिल्ह्यातील दिव्यांगांना संगणकीय प्रणालीने प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये ११ जानेवारीपासून शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिरांना ११ ते २ या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.
११ जानेवारी रोजी मालवण ग्रामीण रुग्णालय (डॉ. धनंजय रासम, डॉ. बाळासाहेब जोशी, डॉ. शमा राणे, डॉ. रुपाली पाटील), १८ रोजी-देवगड ग्रामीण रुग्णालय- (डॉ. संदीप भगत, डॉ. बाळासाहेब जोशी, डॉ. शमा राणे, डॉ. रुपाली पाटील), २० रोजी-वैभववाडी ग्रामीण रुग्णालय, २५ जानेवारी – सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय, २७ जानेवारी-कुडाळ ग्रामीण रुग्णालय, १ फेब्रुवारी-कणकवली उपजिल्हा रुग्णालय, ३ फेब्रुवारी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय, ८ फेब्रुवारी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय या सर्व रुग्णालयांमध्ये डॉ. धनंजय रासम, डॉ. बाळासाहेब जोशी, डॉ. शमा राणे, डॉ. रुपाली पाटील, तर बुधवार व शुक्रवार जिल्हा रुग्णालय-डॉ. संदीप एस. भगत, डॉ. बाळासाहेब जोशी, डॉ. शमा राणे, डॉ. रुपाली पाटील आदींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
