तळगाव येथे ‘बंदिस्त शेळी’ पालन मार्गदर्शनाचे आयोजन

*⚡मालवण ता.०६-: कृषी आणि कृषीपुरक क्षेत्रातील आवड असणाऱ्या तरुणांसाठी कारागीर ॲग्रो या संस्थेच्यावतीने ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. मालवण-तळगाव येथील श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय येथे ‘बंदिस्त शेळी पालन’ या विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबीर सर्वांसाठी खुले असून याचा तरुणांनी व शेळी पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कारागीर ॲग्रोचे संस्थापक अमित दळवी यांनी केले आहे. या शिबिराला मार्गदर्शक सुमित भोसले उपस्थित राहणार आहे. माहितीसाठी गीतेश परब (७४४८०८०१२४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page