*⚡मालवण ता.०५-: चौके येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सौ. वैभवी चौकेकर यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत देवगड कातवण येथील सौ. अस्मिता पेडणेकर या विजेत्या ठरल्या. त्यांना सोन्याची नथ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेस मान्यवर म्हणून व्यासपीठावर सलून अँड पार्लर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा सौ. सायली मांजरेकर, युवा परिवर्तनचे मालवण तालुका समन्वयक व भंडारी कॉलेजचे प्राध्यापक देवेंद्र चव्हाण, विजय चौकेकर, डॉ. शरदचंद्र काळसेकर, ग्रा.पं. सदस्य सौ. दीपिका चौकेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सौ. अनिता चौकेकर, माजी फौजदार दुलाजी चौकेकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या चौके येथील पूजा म्हापणकर यांना चांदीचे पैंजण, तर तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या कर्लाचाव्हाळ येथील सौ. भाग्यश्री मळाळ यांना चांदीचे नाणे देऊन गौरविण्यात आले. तसेच सौ. अनिता आळवे (मालवण), स्वाती दाभोळकर – आंबेरकर (दाभोळे), अंजली घाडी (नांदरुख), रेखा सिंग (देवगड कातवण) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी चौके सरपंच राजा गावडे, प्रीतम गावडे, विजय चौकेकर, आपा चौकेकर, दीनानाथ गावडे, नंदकुमार राणे, सुरेश चौकेकर, गीता विनायक चौकेकर, विशाल गावडे, दीपक यंदे, डॉ. शरदचंद्र काळसेकर, गणपत चौकेकर, सखाराम तावडे, शिवाजी गावडे, महेश पेंडूरकर, भारती अहिरे, तातू गावडे, मधुकर चौकेकर यांचे सहकार्य लाभले.
