प्रा.यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा ७ जानेवारीपासून

*⚡वेंगुर्ला ता.०५-:* कलावलय वेंगुर्ला आयोजित व बी.के.सी.असोसिएशन मुंबई पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ७ ते ९ जानेवारी कालावधीत नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृह कॅम्प-वेंगुर्ला येथे संपन्न होणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते होणार असून यावेळी ख्यातनाम चित्रकार अरुण दाभोलकर व माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप हे उपस्थित राहणार आहेत. दि.७ रोजी सायंकाळी ४ पासून समांतर सांगली-‘समांतर‘, आचरेकर प्रतिष्ठान कणकवली-‘लज्जा द्यावी सोडून‘, ढ मंडळी पिगुळी-‘बिलीमारो‘, आचरेकर प्रतिष्ठान कणकवली-‘सेकंड हॅण्ड‘, इंद्रधनू कलामंच दाभोली-‘जन्मजन्मांतर‘, दि. ८ सायंकाळी ४ पासून रोजी बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ-‘बोझं‘, सत्कर्व मुंबई-‘बायल करी घायल‘, झिरो बजेट प्रॉडक्शन सिधुदुर्ग-‘कॅलिडोस्कोप‘, मघाधन मुंबई-‘सिटीलाईट‘, कलाकार्स थिएटर ठाणे -‘लेखक‘, दि.९ रोजी सकाळी ११ पासून गायन समाज देवल क्लब कोल्हापूर -‘स.न.वि.वि.‘, नवरंग फाऊंडेशन कोल्हापूर-‘लव्ह बट अॅरेंज‘, गायन समाज देवल क्लब कोल्हापूर-‘इटस् हॅपन्स‘, दुपारी २ ते ४ विश्रांती, ओम सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ भिवंडी-‘स्वप्नात आली बायको झाली‘, राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय इस्लामपूर-‘एका मिठीची गोष्ट‘, प्रणा थिएटर्स ठाणे -‘दोघातल्या एकाची गोष्ट‘, ए एच-०४ प्रॉडक्शन ठाणे-‘ब्रेकअप के बाद‘ आदी एकांकिका सादर होणार आहेत.

रसिकांना प्रवेश विनामूल्य असून या एकांकिकांचा आनंद लुटावा असे आवाहन कलावलय तर्फे केले आहे.

You cannot copy content of this page