बांदा सरपंच अक्रम खान यांनी केले कौतुक….
*⚡सावंतवाडी ता.०४-:* येथील तलावाकाठी बाजार भरवण्याचा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतलेला निर्णय हा नागरिकांसाठी सोयीस्कर असून रात्री उशिरापर्यंत देखील बाजार फुललेला असतो. त्यामुळे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतलेल्या या निर्णयाचे बांदा सरपंच अक्रम खान यांनी कौतुक केले आहे.
पूर्वी बाजार उभा बाजार येथे भरवला जात होता. परंतु तेथील राहत असलेल्या स्थानिकाना गैरसोय होत असल्याने हा बाजार बाजार काही दिवस वादात सापडला होता. त्यानंतर संजू परब यांनी तलावाकाठी बाजार भरवण्याचा निर्णय घेतला. हा बाजार गेले वर्षभर या ठिकाणी भरवला जात असून, नागरिकांना खरेदी करण्यासाठी सोयीस्कर होत असल्याने नागरिकांनी देखील याचं समाधान व्यक्त केले आहे.
