अनुचित प्रकार घडण्याची शक्यता;माजी नगरसेवक परिमल नाईक यांची मागणी
*⚡सावंतवाडी ता.०४- जिओ कंपनीकडून शहरात केबल टाकण्यासाठी मारलेले चर बुझवण्यसाठी वापरलेली खडी शहरातील त्या त्या रस्त्यांवर अस्थाव्यस्थ टाकली असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी सबंधित ठेकेदाराने ती खडी बाजूला करून रस्ता व्यवस्थित करण्याचा सूचना देण्यात याव्यात अशी मागणी माजी नगरसेवक परिमल नाईक यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हंटले आहे की, सालईवाडा, मोरडोंगरी भागात जिओ केबल साठी मारण्यात आलेले चर बुझवण्यासाठी खडी टाकण्यात आली होती. ती अस्ताव्यस्त टाकण्यात आल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने तातडीने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


