आमदार दीपक केसरकर यांचा आरोप…
*⚡सावंतवाडी ता.०३-:* सिंधुदुर्गातील लोक राणेंना कंटाळली असून, राणे जिल्हा बँक हरणार म्हणून वरिष्ठांनी जिल्हात कुमक पाठवल्यानेच जिल्हा बँक आमच्या हातून गेली आहे. हा राणेंचा नाही तर धनशक्तीचा विजय असल्याचा टोला आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे. यावेळी त्यांनी आमचा झालेला पराभव आम्ही 100 टक्के मान्य करतो. असे मत त्यानी व्यक्त केले.
यावेळी ते पुढे म्हणाले की, सुशांत नाईक यांनी खुप मेहनत घेतली त्याचेच फळ त्यांना विजयाच्या स्वरूपात मिळाले आहे. जी मेहनत राजन तेली यांचा पराभव करण्यासाठी सुशांत नाईक यांनी घेतली तेवढीच मेहनत जर इतरांनी घेतली असती तर आज चित्र वेगळे दिसले असते अशी खंत व्यक्त करताना त्यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठ येथे येऊन थांड मांडून बसत नसल्यानेच त्याचा फटका पक्षाला बसत असल्याचे मत व्यक्त केले आहे. यावेळी नारायण राणे सारख्या मंत्र्यांशी दोन हात करणाऱ्या सतिश सावंत यांचे राजकीय पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण वरिष्ठांकडे त्याबाबत चर्चा करणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.