सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे भूमिपूजन

माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते भूमिपूजन

*⚡सावंतवाडी ता.०३-: कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सर्वत्र ऑक्सिजन प्लांट बसवण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लांट चे आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना आमदार केसरकर म्हणाले की, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन प्लांट बसविण्यात येणार आहेत. यामध्ये एका प्लांट मध्ये ऑक्सिजन निर्मिती केली जाणार असून, दुसऱ्या प्लांट मध्ये लिक्वीड ऑक्सिजन स्टोर करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

You cannot copy content of this page