तेली समाज उत्कर्ष मंडळ आयोजित कार्यक्रमात खासकीलवाडा सर्व पक्षीय उपस्थित
सावंतवाडी ता.०३-:परमपुज्य संताजी जगनाडे महाराजांची ३२२ वी पुण्यतिथी तेली समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडी च्या वतीने कोरोना नियमाचे पालन करत परमपुज्य संताजी नगर न्यु खासकिलवाडा येथे साजरी करण्यात आली सर्व धर्मीय भक्त गणांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला.
परमपुज्य संताजी जगनाडे महाराजांची ३२२ वी पुण्यतिथी निमित्त प. पू संताजी जगनाडे महाराजांच्या मूर्तीचे आगमन सकाळीच्या सुमारास साध्या पध्दतीने करण्यात आले. मूर्ती विराजमान झाल्यावर ब्रह्मणाद्वारे गिरिधर कोरगांवकर व सायली कोरगांवकर दांपत्याने अभिषेकाव्दारे वेदोक्तपूजन केले त्यानंतर आरती तिर्थप्रसाद झाला प्रतिवर्षी प्रमाणे महाप्रसाद भंडारा कार्यक्रम पार पडला. रात्री पाटेश्वर प्रासादिक भजनी मंडळाचा सुश्राव्य कार्यक्रमाव्दारे सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश तेली, उपाध्यक्ष शाम निवेलकर, खजिनदार दिपा तेली, अध्यक्ष जयराम आजगांवकर, दिनकर तेली, हरिश्रचंद्र तेली, विनायक तेली, मनोज बांदेकर व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले
