राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी शिवराज सावंत यांची निवड

सचिवपदी संदिप शिंदे तर राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे

*⚡मालवण ता.०२-: राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्गची कार्यकारीणी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी जाहीर केली असून या संघाच्या जिल्हाध्यक्षपदी राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शिवराज विठ्ठल सावंत यांची नियुक्ती केली आहे राष्ट्रीय राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक घेण्यात आली.

यावेळी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून शिवराज सावंत यांची घोषणा करताना जिल्हा सचिवपदी राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.संदिप बळवंत शिंदे यांची निवड जाहीर केली तसेच राज्य कार्यकारीणीत राज्य कार्याध्यक्षपदी राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.दशरथ शिंगारे यांची निवड करण्यात आली आहे . यावेळी उर्वरीत जिल्हा कार्यकारीणी करण्याची जबाबदारी राज्याध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्ष यांच्यावर सोपविली.मसुरे गावचे सुपुत्र असलेल्या शिवराज सावंत यांच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page