वेंगुर्ला प्रतिनिधी– गोवा, पेडणे तालुक्यातील कोरगांव येथील ग्रामदैवत श्री कमळेश्वर मंदिरात ३१ डिसेंबर रोजी अंबा भवानीच्या वाढदिवसानिमित्त गोंधळ आणि जोगवा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी दरवर्षीप्रमाणे वेंगुर्ला शहरातील श्री रामेश्वर, भुजनागवाडी व दत्तप्रासादिक या मंडळातील भजनी मंडळींनी यात सहभाग घेतला होता.
कोरगांव येथील अंबा भवानीचा गोंधळ उत्सव भक्तिमय वातावरणा संपन्न झाला. यावेळी विजय गुरव, सचिन डिचोलकर, दिगंबर किनळेकर, रुपेश माडकर, शैलेश मयेकर, भुषण गोकरणकर, जीवन तुळसकर, मनोज पांगम, मोहन पालकर, देवेन मयेकर, मोहित डिचोलकर, चिन्मय डिचोलकर, सोहम भगत, दादा फटजी, दुर्गेश भगत, कुशल दामले, कौशल नातू, महादेव मेस्त्री, अशोक कोलगांवकर, विनायक वारंग, प्रथमेश गुरव, संजय भाटकर आदी उपस्थित होते. वेंगुर्ला येथील ज्येष्ठ वारकरी विजय गुरव हे सलग २१ वर्षे कोरगांव येथील या उत्सवात सहभागी होत गोंधळ व जोगवा म्हणत आहेत.
