व्यापारी संघातर्फे दीपक बेलवलकर यांचा सत्कार

कणकवली 1 जानेवारी (प्रतिनिधी)- कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांची कणकवली नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण ब्रॅण्ड अ‍ॅबेसिडर म्हणून निवड केली आहे. याबद्दल कणकवली तालुका व्यापारी संघाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी महेश नार्वेकर, राजू गवाणकर, अमोल कामत, राजन पारकर, नंदू उबाळे, बंडू खोत, सुरभा गावकर, शेखर गणपत्ये, निवृत्ती धडाम, राजा राजाध्यक्ष, हेमंत गोवेकर, विशाल कामत, नितीन पटेल आदी व्यापारी उपस्थित होते. व्यापारी संघाने सत्कार केल्याबद्दल श्री. बेलवलकर यांंनी संघाचे आभार मानले.

You cannot copy content of this page