नवीन वर्षापासून दोन दिवस आड पाणी पुरवठा

नळ कनेक्शन धारकांनी पाण्याचा जपून वापर करावा : वेंगुर्ला नगर परिषदेतर्फे आवाहन

*💫वेंगुर्ला दि.३०-:* १ जानेवारीपासून वेंगुर्ला शहरातील नळ कनेक्शन धारकांना नगरपरिषदेमार्फत होणारा पाणी पुरवठा दोन दिवस आड करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नळ कनेक्शन धारकांनी पाण्याचा जपून व योग्यप्रकारे वापर करावा, असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे. निशाण तलावातील अस्तित्वातील पाणी साठा, तलावाचे चालू असलेले उंची वाढविण्याचे काम, हवामानातील बदल, सध्याचे तापमान व लोकांची पाण्याची वाढती मागणी याचा विचार करुन १ जानेवारीपासून वेंगुर्ला शहरातील नळ कनेक्शन धारकांना दोन दिवस आड पाणी पुरवठा होणार आहे. हा पाणी पुरवठा १ जानेवारीला होणार असून त्यानंतर ४ जानेवारी रोजी पाणी पुरवठा होईल. त्यानंतर दोन दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येईल. तरी सर्व नळ कनेक्शन धारकांनी याची नोंद घेऊन सहकार्य असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page