सरपंच, ग्रामसेवकांसाठीच्या कार्यशाळेत तीन ग्रामपंचायतींचा सन्मान…

*💫वेंगुर्ला दि.३०-:* वेंगुर्ला येथे सुरु असलेल्या सरपंच, ग्रामसेवकांसाठीच्या कार्यशाळेत स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त मठ ग्राम पंचायतीचे सरपंच तळशीदास ठाकूर, ग्रामसेवक विकास केळूसकर, तत्कालीन ग्रामसेवक विवेक वजराटकर, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त वेतोरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भूषण चव्हाण, वेतोरे सरपंच राधिका गावडे यांचा पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर गटविकास अधिकारी उमा पाटील, आरोग्य विस्तार अधिकारी एस. बी. गोसावी, एस. टी. परब, प्रशिक्षक दादा साईल, संतोष पाटील, कृषी विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर आदी उपस्थित होते. मठ, वजराट, वेतोरे यांप्रमाणेच तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही गाव विकास प्रक्रीयेत लोकांना सामावून घेऊन गावाचा विकास करावा असे आवाहन अनुश्री कांबळी यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page