सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आवाहन
*💫कुडाळ दि.३०-:* उद्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गड किल्ल्यांवर दारू पार्टी किंवा इतर कोणतीही पार्टी कोण करत असेल सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागचे दुर्गसेवक अशांवर लक्ष ठेवून असणार आहेत. त्यासाठी दुर्गसेवक गडावरच ठाण मांडणार आहेत. त् यामुळे गड किल्ल्यांवर कोणीही दारू तसेच इतर कुठलीही पार्टी करून धिंगाणा घालू नये, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. जर पार्टी करताना कोण आढळल्यास नवीन वर्षाच्या शुभेच्छा प्रतिष्ठानकडून प्रतिष्ठानच्या भाषेत देण्यात येतील, अशी ताकीदही प्रतिष्ठानकडून देण्यात आली आहे.
