माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांची राज्य सरकारवर टीका
*💫सावंतवाडी दि.३०-:* माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांनी बॅ नाथ पै सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्त बोलताना माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांचे कौतुक केले आहे. भाजप शिवसेना राज्यात सत्तेत असताना चांदा ते बांदा ही योजना मंजूर करून घेतले होती. परंतु आताच्या महाविकास आघाडी सरकारने जाणूनबुजून पूर्णविराम दिला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. आमच्या काळात देण्यात आलेला निधी योग्य प्रकारे नगरपालिकेच्या अंतर्गत राजकारणामुळे वापरला नसल्याने तो परत गेला असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
