*⚡मालवण ता.२७-:* महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करियर कट्टा’ हा उपक्रम प्रत्येक महाविद्यालयात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात देखील करियर कट्टा उपक्रम राबविण्यात येत असून विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने करीअर कट्टा या फलकाचे अनावरण महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांच्या हस्ते झाले.
या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. IAS आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला , भारतीय संविधानाचे पारायण, वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी हे उपक्रम दररोज ऑनलाइन स्वरूपात दररोज आयोजित केले जातात त्याच बरोबर फौडेशन कोर्स स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी, सायबर सिक्युरिटी कोर्स, इ फाईलिंग कोर्स वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्या साठी इत्यादी कोर्सचे आयोजन केले आहे. ‘करीअर कट्टा’ फलकाच्या अनावरण प्रसंगी प्राचार्या उज्वला सामंत यांच्यासह करियर कट्टा समन्वयक एस. एस. पवार, डॉ. एस.एस.नाईक , डॉ. एम.आर.खोत तसेच महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. करिअर कट्टा उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन या वेळी करिअर कट्टा मार्फ़त करण्यात आले
