*⚡मालवण ता.२७-:* रोटरी क्लब, मालवण तर्फे शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी गीताई- गीता पाठांतर स्पर्धा दि. ९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते चौथी- गीताई पहिले १० श्लोक, पाचवी ते सातवी- गीताई एक ते वीस श्लोक, आठवी ते दहावी – गीता- पहिल्या अध्यायाचे पहिले १० श्लोक असे गट या स्पर्धेसाठी आहेत. प्रत्येक शाळेने प्रत्येक गटातून पाच स्पर्धकांची नावे द्यावीत. नाव नोंदणीसाठी ९४२१२३७८३२/ ९८१९९१०९४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रोटरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.
रोटरी क्लबतर्फे गीताई- गीता पाठांतर स्पर्धा
