पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा कोमसाप मालवण तर्फे अक्षरगौरव

*⚡मालवण ता.२७-:* प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या मराठी साहित्यिकांची ओळख करून देणारे सिंधू साहित्य सरिता हे पुस्तक अनमोल ठेवा आहे. कुठे अन्यत्र नसलेले पिंगुळीच्या कलांगणातील हे चित्रकथीचे सांस्कृतीक धन जतन करण्यासाठी मराठी साहित्य परिषदेने पुढाकार घेऊन साहित्यातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी पिंगुळी येथे केले.

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या कार्यकारीणीने रविवारी कुडाळ येथील पिंगुळी येथे पद्मश्री परशुराम गंगाराम गंगावणे यांनी साकारलेल्या कलांगणाला भेट दिली. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे यांना कोमसाप मालवणच्या लेखकांनी लिहिलेले सिंधूसाहित्यसरिता हे पुस्तक कोमसापचे जेष्ठ सदस्य अशोक कांबळी यांच्या हस्ते प्रदान करत गंगावणे यांचा अक्षरगौरव करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सुरेश ठाकूर, सदानंद कांबळे, सुगंधा गुरव मंदार सांबारी, दौलत राणे, मनाली फाटक, एकनाथ गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी गंगावणे यांनी ठाकर समाजाने चित्रकथीच्या माध्यमातून मनोरंजनासोबत अध्यात्म आणि ज्ञान प्रसार कसा केला याची माहिती उपस्थितांना दिली.

You cannot copy content of this page