ओझर विद्यामंदिरच्या हिरकमहोत्सवा निमित्त आयोजित सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत प्राजक्ता, मंथन प्रथम

*⚡मालवण ता.२७-:* मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या शाळेच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत इ.५ वी ते ७ वी च्या प्राथमिक गटात प्राजक्ता अभय ठाकूर देसाई (शेठ नवीनचंद मफतलाल विद्यालय, खारेपाटण) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर ८वी ते १० वी च्या गटात प्रथम क्रमांक मंथन दत्ताराम करलकर (भंडारी हायस्कूल, मालवण) याने पटकावला या स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे द्वितीय क्रमांक भाविक गजानन मेस्त्री (जिल्हा परिषद शाळा तेंडोली नं.1), तृतीय भूमी आशिष नाबर (न्यू इंग्लिश स्कूल आचरा), उत्तेजनार्थ प्रथम अस्मी प्रविण पारकर (ओझर विद्यामंदिर कांदळगाव), द्वितीय कुमार दत्तप्रसाद तेंडोलकर (दत्ता सामंत स्कूल, देवबाग ) तृतीय सुशील दत्तात्रय प्रभूकेळुसकर (अ.शि .दे. टोपीवाला हायस्कूल मालवण), चतुर्थ तुकाराम रामचंद्र लाड(ओझर विद्यामंदिर कांदळगाव) . तर ८वी ते १० वी च्या गटात प्रथम क्रमांक मंथन दत्ताराम करलकर (भंडारी हायस्कूल, मालवण), द्वितीय क्रमांक आर्या प्रविण पारकर, तृतीय अवधूत राजेंद्र पारकर (ओझर विद्यामंदिर कांदळगाव) यांनी यश मिळविले.

स्पर्धेचे उद्घाटन हडी गावचे सरपंच व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य माजी विद्यार्थी श्री. महेश मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर कांदळगाव सरपंच सौ. उमदी परब, संस्थेचे पदाधिकारी श्री उदय परब, मुख्याध्यापक श्री. पी.आर. खोत, पत्रकार श्री. संतोष गावडे आदी मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ही स्पर्धा श्री. प्रभाकर सुर्वे व श्री. कृष्णा दिगंबर राणे, माजी सरपंच कांदळगाव यांनी पुरस्कृत केली होती. संगीत साथ आदर्श संगीत विद्यालय मालवणचे श्री. मंगेश कदम, श्री. विजय बोवलेकर, वैभव मांजरेकर, विरेश वळंजू यांनी दिली. परीक्षक म्हणून कुडाळ येथील संगीतकार श्याम तेंडोलकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे व स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री. पी.आर. पारकर यांनी केले, आभार श्री. पी.के. राणे यांनी मानले.

You cannot copy content of this page