तोंडवली बावशी मध्ये ७ जागांसाठी १९ अर्ज दाखल झाले.
*💫कणकवली दि.२९-:* कणकवली तालुक्यातील होवू घातलेल्या ग्रा.पं.निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याचे शेवटचा आजचा एक दिवस शिल्लक असताना एकूण तोंडवली बावशी मध्ये २९ डीसेंबर सांय.पर्यंत ७ जागांसाठी १९ अर्ज दाखल केले आहेत.तर भिरवंडे गांधीनगर मध्ये अर्ज दाखल नाही. यामुळे आजचा शेवटच्या दिवशी उमेदवार व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार निवडणूक कार्यालय गजबजून जाणार हे मात्र नक्की. १५ जानेवारी २०२१ रोजी होवू घातलेल्या पैकी कणकवली तालूक्यातील तिन ग्रामपंचायतीचा समावेश आहे .यात तोंडवली –बावशी ग्रुप ,भिरंवडे ,गांधीनगर अशा ग्रा.च्या मुदत ऑगस्ट २०२० रोजी संपल्या होत्या .येथे शासनामार्फत प्रशासक नेमण्यात आले होते .आता निवडणूका जाहीर झाल्याने २३ डीसेंबर पासून उमेदारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज ३० डीसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या निवडणूकीला सरपंच पदाचे आरक्षण न पडल्याने इच्छूकांची चांगीलच पंचाईत झाली असून ते हीरमुसलेले पाहवयास मिळत आहेत. अर्ज दाखल करण्यास शेवटची तारीख ३० डीसेंबर रोजी असली तरी ४ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी या तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तोंडवली व बावशी अथवा इतर तिन्ही गावा मध्ये आताच्या होणा-या निवडणूकीत शिवसेना विरूध्द भाजपा यांच्यातच काटेकी टक्कर पहावयास मिळणार हे निश्चीत आहे. तोंडवली –बावशी ग्रुप ग्रा.पं.ला सेना व भाजपा कडून प्रतिष्ठेची केली जाणार असल्याचे पाहवयास मिळत आहे.कारण सेनेच्या ताब्यातील ग्रा.पं.भाजपाकडे खेचण्यासाठी वरीष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागले असल्याचे दिसत असून भाजपाचा झेंडाच फडकणार असल्याचा दावा निवडणूका जाहीर होण्याअगोदरच काहींनी केलेला आहे.तर तेथील सेनेचे ही पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा आमचाच भगवा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत आहेत .मात्र दावे प्रतिदावे आता जरी सुरू असले तरी १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी असल्याने याच दिवशी कौन कितने पानीमे सिध्द होणार आहे .
