शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा ग्रामस्थांचा आरोप : आग विझविण्याचे काम सुरू
*⚡बांदा ता.२५-: मडुरा परबवाडीतील मळ्यात दुपारच्या सुमारास अचानक उडवीना आग लागून बाबली चिंतू परब यांचे मोठे नुकसान झाले. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु दुपारची वेळ असल्याने आगीने उग्ररूप धारण केले अन् मदतीचे हात तोकडे पडले.
अनेकवेळा सांगूनही वीज प्रशासनाने दुर्लक्ष केले असून शॉर्ट सर्किटमुळेच उडवींना आग लागल्याचा आरोप ग्रामस्थ व मडुरा तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाळू गावडे यांनी केला. पंचवीस ते तीस ग्रामस्थ अजुनही आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
