मसुरेचा लौकिक भोगले पखवाज विशारद

*⚡मालवण ता.२४-:* अखिल भारतीय गंधर्व विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या पखवाज विशारद पूर्ण परीक्षेत मसुरे गडघेरावाडी येथील लौकिक भगवान भोगले याने प्रथम श्रेणी मिळवित यश प्राप्त केले आहे. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने हे यश मिळविले आहे.

पखवाजचे शास्त्रोक्त शिक्षण त्याने गुरुमाऊली संगीत विद्यालय, मसुरे येथील सचिन कातवणकर यांच्याकडून घेतले आहे. त्याला महेश सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. कुडाळ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शास्त्र शाखेत तो बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. आठव्या वर्षापासून तो पखवाज शिकत आहे. लौकिकने मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page