एसटी संपात सहभागी कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न.

गुन्हा दाखल करण्यासाठी संपकऱ्यांची पोलीस स्थानकात धाव

*⚡कणकवली ता.२४-:* गेले 50 दिवस सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या अंगावर आज सकळी 10 वा. चालकाने शिवी गाळ करत गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

यामुळे कणकवली एसटी आगारातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कणकवली बस स्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केलेल्या ड्रायव्हरने येऊन माफी मागावी अन्यथा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करणार असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी गणेश शिरकर , बालाजी गुट्टे,बालाजी मुंडे,मुळये,नेरकर, पवार, मोरे, सामंत,प्रकाश वालावलकर, परब,केंद्रे,माने,मसुरकर, दळवी,हांडे,जाधव ,वाळके, व बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page