*⚡मालवण ता २३-:* मसुरे गडघेरावाडी येथील माजी सैनिक मोहन शंकर दुखंडे (९१ वर्ष) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, दोन भाऊ, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे.
प्राथमिक शिक्षक भारती संघटना महाराष्ट्र राज्य संघटक व जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा सावडाव खलांत्रीचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. किसन दुखंडे, रिक्षा व्यावसाईक महेश दुखंडे व रविंद्र दुखंडे यांचे वडील तर राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त पोलीस अधिकारी विजय दुखंडे यांचे भाऊ होत. मसुरे स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
