तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांची दारू जप्त…
*⚡सावंतवाडी ता.२३-:* अवैधरित्या होणाऱ्या दारू वाहतूकीवर सिंधुदुर्ग एलसीबीकडून आज सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून, तब्बल दीड ते २ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. दुपारी एकच्या सुमारास आकेरी- हुमरस या ठिकाणी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, एलसीबी पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. एपीआय महेंद्र घाग यांनी ही धाडसी कारवाई केली असून सुमारे अडीच ते ३ हजार दारुचे बॉक्स कंटेनरमध्ये असण्याची शक्यता असून पोलिसांची कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्रातील हि सर्वात मोठी कारवाई असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकेरी हुमरस इथे हि धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई बद्दल सिंधुदुर्ग पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे, एपीआय महेंद्र घाग, एलसीबीची टीम उपस्थित होती.
