युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांचा इशारा...
सावंतवाडी-: अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात वसलेल्या छत्रपती शिवरायांचा कर्नाटक राज्यात वारंवार होणाऱ्या अवमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही, यापुढे अशी घटना झाली तर महाराष्ट्रात कर्नाटक राज्याची एकही गाडी फिरकू देणार नाही असा सज्जड इशारा युवा सेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी दिला आहे.
कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. ही घटना ताजी असतानाच दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा काही तरुणांकडून असा प्रकार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून युवासेनेच्या माध्यमातून उद्यापासून एकही कर्नाटकची गाडी महाराष्ट्र येऊ दिली जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला असून, कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.
यावेळी समस्त शिवप्रेमींनी सावंतवाडी येथील गवळी तिठा येथे उद्या सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन युवासेना उपजिल्हाधिकारी सागर सोमकांत नाणोसकर यांनी केले आहे. जोपर्यंत संबंधितांवर कठोर कारवाई होत नाही. तोपर्यंत एकही गाडी महाराष्ट्रात येऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
