करिअर कट्टा उपक्रमाचा शुभारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी- एमपीएससी स्पर्धा परीक्षा कक्षांतर्गत चालवल्या जाणा-या ‘करिअर कट्टा‘ या उपक्रमाच्या फलकाचे अनावरण येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयात प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांच्या हस्ते झाले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावर ‘करिअर कट्टा‘ हा उपक्रम राबविण्यात येत असून यशस्वी उद्योजक, अधिकारी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी य उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य देऊलकर यांनी केले. यावेळी प्रा.नवत्रे, प्रा.नरगच्चे, प्रा.गायकवाड, प्रा.नैताम, प्रा.वामन गावडे, प्रा.सूर्यवंशी आणि ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.शितोळे आणि विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा कक्षाचे समन्वयक प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा.डी.आर.आरोलकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page