ग्रा.पं. पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयी उमेदवारांचे आम.नितेश राणे यांनी केले अभिनंदन

*⚡कणकवली ता.२२-:* कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत हळवल व लोरे न.१ या दोन्ही जागांवर भाजप पुरस्कृत काशिराम भाऊ नवले(लोरे न.१) व सुदर्शन राणे उमेदवारांचा विजय झाला आहे.या दोन्ही विजयी उमेदवारांचे आ.नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ कौतुक केले.

लोरे न.१ ग्रामपंचायत प्रभाग ३ पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार काशिराम भाऊ नवले यांचा ११२ मतांनी विजय झाला आहे.तसेच हळवल ग्रामपंचायत प्रभाग १ पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार सुदर्शन राजाराम राणे ४३ मतांनी विजयी झाले आहेत. दोन्ही विजयी उमेदवारांचे आ.नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ कौतुक केले.

यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गोट्या सावंत,कणकवली सभापती मनोज रावराणे, कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,तालुका उपाध्यक्ष शशी राणे,लोरे सरपंच अजय रावराणे,संदीप सावंत,सचिन पारधीये,स्वप्निल चिंदरकर,नरेश गुरव,समीर प्रभुगावकर,शिवा राणे,लवू परब व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page