७२० दिवसांचा कार्यकाल यशस्वी केल्याने करण्यात आला सत्कार…
*⚡सावंतवाडी ता.२२-:* सावंतवाडी नगरपालिकेचा ७२० दिवस कारभार यशस्वीरीत्या सांभाळून आपली अल्प अशी कारकीर्द यशस्वी करत, सावंतवाडी वासियांच्या मनात आपले एक आदराचे स्थान निर्माण करणारे नगराध्यक्ष संजू परब यांचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपत असल्याने शहर भाजपच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना शहर अध्यक्ष अजय गोंदावळे म्हणाले की, नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांच्या कार्यकालात अनेक बंद पडलेले, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत सुरू केले आहेत. मोडकळीस आलेला शहाबुद्दिन हॉल दुरुस्त करून, त्याला नवसंजीवनी दिली, भाजी मार्केटची समस्या सोडवल्या, तसेच आठवडा बाजाराची समस्या सोडवत तलावाच्या काठावर आठवडा बाजारासाठी जागा उपलब्ध करून दिली. तसेच शहरातील कचरा समस्या सोडवताना त्यानी कचरा डेपो चे काम मार्गी लावले, असे सांगताना नगराध्यक्ष संजू परब यांनी केलेल्या विकास कामाचा उजाळा दिला.
यावेळी त्यांनी शुभेच्छा देताना भावी आमदार म्हणून त्यांना पाहण्याची इच्छा असल्याचे मत मांडत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देताना आमदारकीसाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी महिल शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर,नगरसेवक मनोज नाईक,नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवीका दिपाली भालेकर,नगरसेवीका समृद्धी विरनोडकर नगरसेविका उत्कर्षा सासोलकर युवा भाजप शहराध्यक्ष संदेश टेमकर,बांदा सरपंच अक्रम खान, जावेद खतिब,संदीप बांदेकर,बंटी पुरोहित,राज वरेरकर,अनिल सावंत,पिट्या सावंत,अनिल निरवडेकर, दिलीप भालेकर विनोद राऊळ,विनोद सावंत, हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते.
