जेष्ठ व्यापारी बाबा कुळकर्णी यांचे निधन

*⚡देवगड ता.२२-:* देवगड मधील पहिले औषध विक्रेते व मे. जनार्दन मंगेश कुळकर्णी आणि कंपनीचे मालक, देवगड अर्बन बँकेचे माजी चेअरमन अनंत जनार्दन कुळकर्णी यांचे मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वयाच्या ९७ व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.

`बाबा कुळकर्णी’ या नावाने ते सुपरिचित होते. पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा पाfरवार आहे. देवगड ग्रामीण रुग्णालयासमोरील कुलकर्णी मेडिकलचे मालक किशोर कुलकर्णी यांचे ते वडील तर देवगड अर्बन बँकेचे संचालक अभय कुळकर्णी यांचे ते आजोबा होत.

You cannot copy content of this page