जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर
सावंतवाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथे वटसावित्री सभागृहात श्री संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सकाळी संत गाडगेबाबा भाजी मंडई येथे साफसफाई व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन श्री व सौ दीपक सांगेलकर यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले.यावेळी परीट समाज बांधवांच्या व भगिनींच्या झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणाले की सर्व समाज बांधवांनी एकसंघ राहणे फार आवश्यक असून श्री संत गाडगेबाबा यांचे विचार जनमानसात पोहोचवणे फार गरजेचे आहे.तरच खऱ्या अर्थाने गाडगे बाबांची पुण्यतिथी आपण साजरी केल्याचे सार्थक होईल.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, नगरसेविका सौ दिपाली भालेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, योगेश आरोलकर, जितेंद्र मोरजकर, प्रदीप भालेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.यानंतर दुपारी महाप्रसाद उपस्थितांना देण्यात आला. यानंतर कुटीर रुग्णालय व राणी जानकीबाई सुतिकागृह येथे फळे व प्रसाद वाटप करण्यात आले.कोविडचे सर्व नियम पाळून उत्साहात ही गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.तसेच सायंकाळी भजन व कीर्तनाचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, योगेश आरोलकर, जितेंद्र मोरजकर, दयानंद रेडकर प्रदिप भालेकर, देवेंद्र होडावडेकर, लक्ष्मण बांदेकर,सुरेंद्र कासकर, रितेश चव्हाण,भगवान वाडकर, मनोहर रेडकर, दिनेश होडावडेकर, किरण वाडकर, सुरेश पन्हाळकर, महेश तळवणेकर, मधुकर मोरजकर, जगन्नाथ वाडकर, विजय सांगेलकर, अनिल होडावडेकर,दिपक सांगेलकर, सुनील होडावडेकर, स्वप्निल कदम, सत्यवान चव्हाण, ज्ञानेश्वर भालेकर, संतोष मडवळ आदी समाज बांधव उपस्थित होते
