बोर्डवे शाळेच्या प्रियजा राऊत यांचा द्वितीय क्रमांक
*⚡कणकवली ता.२१-:* बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या शासन मान्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव मासिकाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यभरातून 289 शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता.यामध्ये श्रीम.प्रियजा प्रविण राऊत(जि. प. प्राथमिक शाळा बोर्डवे नं 3 ,ता. कणकवली जिल्हा सिंधदुर्ग) यांनी व्दितीय क्रमांक पटकावला असून सौ. प्रतिमा चव्हाण, धुळे यांनी प्रथम तर विद्या साबळे, सोलापूर यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.
यांच्यासह पाच उत्तेजनार्थ क्रमांक ही देण्यात आले आहेत. प्रियजा राऊत यांनी आजपर्यंत अनेक कवितांचे, चारोळ्यानचे लेखन केलेले असून जीवनगौरव मासिक महाराष्ट्र राज्य कविता गुरुमाऊलींच्या कविकट्टा यांच्यामार्फत अनेक कविता व चारोळ्याना प्रथम, द्वितीय, उत्कृष्ठ असे क्रमांक मिळवलेले आहेत.त्यांनी भारुड , पोवाडा, बालगीत देखील लिहिलेली आहेत .या सर्वांची जीवन गौरव सार्वजनिक वाचनालयातर्फे राज्यस्तरीय निबंध लेखन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या स्पर्धकांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात औरंगाबाद येथे पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. असे जीवन गौरवचे अध्यक्ष रामदास वाघमारे, ऋत्विक वाघमारे,प्रेरणा आझादे, आन्सिराम वाघमारे,राहुल जाधव,संदीप आझादे, प्रणाली वाघमारे यांनी कळविले आहे.
