स्वच्छ सिंधुदुर्ग आणि हरित सिंधुदुर्ग..सायकल राईड सर्वांसाठी.. सर्वांच्या आरोग्यासाठी ‘ टॅगलाईन
*⚡कणकवली ता.२१-:* कणकवली येथील कनक रायडर्स सायकल क्लबच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा सायकल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली शहीद दिनाचे औचित्य साधून ३० जानेवारी २०२२ रोजी ‘ स्वच्छ सिंधुदुर्ग आणि हरित सिंधुदुर्ग , सायकल राईड सर्वांसाठी , सर्वांच्या आरोग्यासाठी ‘ ही टॅगलाईन ठेवून इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ या सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कनक रायडर्स सायकल क्लबच्यावतीने देण्यात आली.
यावेळी सायकलीस्ट असोसिएशनचे सदस्य मकरंद वायंगणकर , कैलास सावंत , यशवंत भोसले , संजय बिडये , रुपेश तेली , वैभव वाघाटे , ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर , विष्णू रामगडे , प्रसाद बुचडे , दिगंबर आडाव , संदेश महेकर , उमेश मोरे , बिपीन मेस्त्री , मंगेश काळगे,मिलिंद पारकर आदी उपस्थित होते. देशाच्या भावी विकासात तरुण आणि मुलांचा महत्त्वाचा वाटा असतो . मुलांनी व विद्यार्थ्यांनी सायकलमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी या दृष्टीने सायकलिंग विद्यार्थ्यांच्या अंगी बानवावे या दृष्टीने विद्यार्थ्यांना सर्वांगसुंदर बनवून निसर्ग व मानवी मूल्यांची आजन्म जपणूक करण्याचा ध्यास घेऊन कनक रायडर्स ही भव्य सायकल मॅरेथॉन घेत आहे .
गेल्या तीन वर्षामध्ये प्रतिदिन ५ किलोमीटर पासून सुरु केलेला प्रवास २०० किलोमीटर पर्यंत नेताना कनक रायडर्सचे अनेक सदस्य दिसत आहेत . इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२१ ही मॅरेथॉन रेन्बो रायडर्स यांनी घेतल्यानंतर इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ चे यजमानपद जिल्हा सायकल असोसिएशनच्या अनुमोदनाने कणकवली कनक रायडर्स सायकल क्लब ही भव्य सायकल रॅली भूषविण्यासाठी सज्ज आहे . यात २५ किलोमीटर , ५० किलोमीटर व १०० किलोमीटर अशी मॅरेथॉन असेल . त्यामध्ये यजमान सिंधुदुर्गासह गोवा , कर्नाटक , औरंगाबाद , पुणे , कोल्हापूर , मुंबई येथील सायकल पटू सहभागी होणार आहेत . यात सहभागी होणाऱ्यांना मेडल्स , सर्टिफिकेट्स व टी – शर्ट दिली जाणार आहेत . या स्पर्धेमध्ये २५ किलोमीटर गटात स्पर्धकांना कणकवली ते कनेडी असा परतीचा , ५० किलोमीटर गटाकरिता कणकवली कनेडी मार्गे फोंडा असा परतीचा , तर १०० किलोमीटर गटाकरिता कणकवली कनेडी मार्गे फोंडा नांदगाव तळेरे साळिस्ते व परतीचा असा मार्ग असेल . स्पर्धेसाठी २५ किलोमीटर दोन तास,५० किलोमीटर चार तास व १०० किलोमीटरकरिता सात तास असा वेळ नि केला आहे . स्पर्धेच्या मार्गावर क्लब तर्फे सपोर्ट व्हेईकल , अॅम्बुलन्स , सोबत तज्ञ सायकलस्वार अशा सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी ठेवली आहे . यात क्रमांकांना फारसे महत्त्व नसून स्पर्धा पूर्ण करण्यावर जास्त भर देण्यात येणार आहे . ज्या स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असेल त्यांच्यासाठी क्लब तर्फे मोबाईल क्रमांक ९४२३६८२८४६ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
