Headlines

कळसुलकर’च्या तीन विद्यार्थिनींना मुख्यमंत्री शिष्यवृत्ती

एनसीसीमधून ज़िल्ह्यात प्रथमच मिळविला सन्मान

*⚡सावंतवाडी ता.१७-:* : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एन. सी. सी.) तीन विद्यार्थिनींना (गर्ल्स कॅडेट) पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला आहे. यात नववीतील आर्या अंकुश गोवेकर, सुकन्या विजय टोपले व संतोषी भिवा जंगम या विद्यार्थिनींचा समावेश आहे.

58 महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्यांदाच मुलींना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. 58 एनसीसी महाराष्ट्र बटालियनचे प्रमुख कमांडिंग ऑफिसर कर्नल एस.सी.के. लेखराज यांच्या हस्ते 317 सी. ए. टी. सी. कॅम्पच्या समारोपप्रसंगी पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी या विद्यार्थिनींना महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री शिष्यवृत्तीचा योजनेचा धनादेश प्रदान करण्यात आला. या विद्यार्थिनींना सुभेदार मेजर दिनेश गेडाम, कळसुलकरचे एन. सी. सी. अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस, प्रशाळेच्या सहाय्यक शिक्षिका साक्षी दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थिनींचे कौतुक केले. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै व सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page