सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिव्हाळा सेवाश्रमात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.१६-:* श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिव्हाळा सेवाश्रम येथे शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब तपासणी, गरजेनुसार ई.सी.जी, फिजीओथेरपी, पंचकर्म होमिओपॅथिक औषधे व मोफत सल्ला देण्यात येणार असून, हे शिबिर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी ( रायवाडी) येथे होणार आहे. याल शिबिरात डॉ. श्रीवदन आरोसकर, डॉ. पूजा कर्पे, डॉ. रवींद्र जोशी, यशवर्धन राणे आणि ग्रुप, अँड अनिल निरवडेकर, सौ. योगिता राणे सहभागी होणार आहेत.

You cannot copy content of this page