सावंतवाडीत २० डिसेंबरला संत गाडगेबाबा पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी होणार साजरी…

परीट जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांची माहिती…

*⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा परिट समाज व सावंतवाडी तालुका परिट समाजाच्या संयुक्त विद्यमाने श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी सावंतवाडी येथील वटसावित्री सभागृह खासकीलवाडा येथे २० डिसेंबर वार सोमवार रोजी साजरी करण्यात येणार आहे.श्री संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ७ वा. श्री संत गाडगेबाबा भाजी मंडई येथे साफसफाई व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. नंतर ९ वाजता श्री संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन, आरती व प्रसाद वाटप होणार असून, त्यानंतर ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिट बांधवांची वार्षिक मिटींग व जमा खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार असून, त्यानंतर ३ वाजता कुटीर रुग्णालय व जानकीबाई सुतिका गृह येथे फळे व प्रसाद वाटप होणार आहे. त्यानंतर सायंकाळी भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती परिट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी दिली आहे.

यावेळी त्यांनी संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी उत्सवास जिल्ह्यातील सर्व परिट बांधव आणि भगिनींनी तसेच शहरातील नागरिकांनी, भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, तालुका सरचिटणीस योगश आरोलकर, तालुका खजिनदार जितेंद्र मोरजकर आदींनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कोरोना नियमांचे काटेकोरपणे पाळून करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page