सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

*⚡मालवण ता.१६-:* सिंधुदुर्ग एसटी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांचा चौथा स्नेहमेळावा सेवानिवृत्त एसटी कर्मचारी श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या वायरी मालवण येथील लौकिक न्याहारी निवास येथे संपन्न झाला. या मेळाव्यात प्रारंभी सर्वांचे स्वागत झाल्यावर हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेले देशाच्या तिन्ही संरक्षण दलांचे मुख्य बिपिन रावत व त्यांचे सहकारी अधिकारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या मेळाव्यास अनंत देसाई, मनीषा पाताडे यांच्यासह इतरांनी पाठविलेल्या शुभेच्छांचे वाचन करण्यात आले. या मेळव्यात विठ्ठल राणे, प्रकाश गोवेकर व तातू नवार यांनी गाणी सादर केली. प्रकाश रेगे यांनी कविता सादर केली. तर अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करत आठवणी जागवल्या. श्री. सुनिल शिंदे यांनी आपल्या मनोगताने वेगळी रंगत आणली. तर दुपारी स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पडला. या मेळाव्याचे आयोजन श्री. विष्णू कोरगावकर यांनी केले होते. मेळाव्यात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.

You cannot copy content of this page