एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला मळेवाड कोंडूरा सरपंच हेमंत मराठे यांचा पाठिंबा…

*⚡सावंतवाडी ता.१६-:* राज्य परिवहन कामगारांच्या वतिने उदया सावंतवाडी येथे काढण्यात येणाऱ्या मोर्च्याला ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे प्रभारी सरपंच हेमंत मराठे यांनी पाठिंबा जाहिर केला आहे.सर्व सामन्य जनता, विद्यार्थी, नोकरदार यांचे एस टी बंद असल्याने मोठे हाल होत आहेत.शासनाने यावर आता तोडगा काढावा असे आवाहनही मराठे यांनी केले आहे. एस टी कामगार आपल्या मागण्यासाठी बेमुदत उपोषण करत असून सर्वच स्तरातून त्याला पाठिंबा मिळत आहे.

You cannot copy content of this page