गणित संबोध परीक्षेत मदर तेरेसा स्कूलचे यश

*⚡वेंगुर्ला ता.१६-:* महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ संलग्न सिधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे घेतलेल्या गणित संबोध परीक्षेमध्ये मदर तेरेसा इंग्शिल मिडियम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीतत यश संपादन केले.

यात इयत्ता आठवीतील जागृती दिनेश तुळसकर व स्नेहा रंजन नार्वेकर यांनी १०० पैकी १०० गुण, इयत्ता आठवीतला युगंधर जगन्नाथ दाभोलकर याने १०० पैकी ९८, नुपूर मिलिद शिवलकर हिने १०० पैकी ७८, इयत्ता सहावीतील कस्तुरी दिनेश तुळसकर हिने १०० पैकी ९८ गुण प्राप्त केले.

या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अॅन्थोनी डिसोजा व गणित अध्यापिका ग्लॅलिस पिटो यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page