हनुमंत गडावर श्रमदानाने स्वच्छता मोहीम

वेताळ प्रतिष्ठान तुळसचा उपक्रम फुकेरी येथे जात राबविली मोहीम

*⚡वेंगुर्ला ता.०८-:* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्यावतीने फुकेरी-दोडामार्ग येथील ऐतिहासिक हनुमंत गडावर श्रमदान व स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर व सचिव प्रा.सचिन परुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ३५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. दिवसभर श्रमदान करीत गडाच्या महाद्वारावरील मातीचा ढिग बाजूला करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पाया भरणीसाठी खोदाई करण्यात येऊन पाया भरणीसाठी लागणा-या दगडांची वाहतुकही करण्यात आली.

You cannot copy content of this page