वेंगुर्ला प्रतिनिधी – मठ येथील रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल मठ आणि महात्मा फुले ब्रिगेड सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ६ डिसेंबर रोजी प्रशालेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ.आंबेडकर यांच्या स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी नूतन मराठा हितवर्धक मंडळ मुंबईचे प्रकाश मठकर, मुख्याध्यापकसुनिल जाधव, अतुल वाढोकार, शिक्षक जी.एम.गोसावी, साक्षी वराडकर, तेजल खानोलकर आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी प्रशांत धुरी-प्रथम, प्राची संतोष दाभोलकर-द्वितीय तर ईशा राघोबा ठाकुर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. महात्मा फुले ब्रिगेड सिंधुदुर्ग यांच्यावतीने विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके देवून गौरविण्यात आले. साक्षी वराडकर यांनी सूत्रसंचालन तर जी.एम.गोसावी यांनी आभार मानले.
मठ हायस्कूलमध्ये फुले, आंबेडकर स्मृतिदिन
