कोलगांव मेटवाडी-झीरंगवाडी-फौजदारवाडी रस्त्याचा समावेश;मागणीसाठी सुमेध गावडे यांचे उपोषण
सिंधुदुर्गनगरी ता ०६ कोलगाव मेटवाडी, झिरंगवाडी ते फौजदार वाडी रस्त्याचे काम मंजुर असताना त्या ठिकाणी रस्त्याचे काम न करता परस्पर अनुदान खर्च घालून निधी हडप करण्यात आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर तात्काळ कारवाई करावी. या मागणीसाठी कोलगाव भोमवाडी येथील सुमेध सुरेश गावडे यांनी आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव मेटवाडी,झिरंगवाडी ते फौजदारवाडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण काम २०२० मध्ये मंजूर झाले होते. मात्र संबंधित रस्त्याचे काम मंजूर झालेल्या ठिकाणी न करता अन्य ठिकाणी निधी खर्च घालून निधी हडप केला आहे. असे सुमेध गावडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर या प्रकरणी शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी ते काम आर्थिक व्यवहार करून मंजूर रस्त्याचे काम न करता अन्य ठिकाणी निधी खर्च केला आहे. काम करताना मंजूर कामाचा नंबर तसाच ठेवून ठेकेदार निश्चित झाल्यानंतर अंदाजपत्रकात आवश्यक ते बदल करून अन्य ठिकाणी निधी खर्च केला आहे. यासाठी कोणत्याही सक्षम अधिकार्याची मान्यता घेतलेली नाही. असा आरोप गावडे यांनी केला आहे. तर संबंधित कामाची सखोल चौकशी करून या कामात दोषी असलेल्या संबंधित शाखा अभियंता कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करावी. तसेच त्यांच्याकडून गैरप्रकारे खर्च करण्यात आलेला निधी वसूल करावा. या मागणीसाठी कोलगाव भोमवाडी येथील सुमेध सुरेश गावडे यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
