रॅम्प वॉक स्पर्धेत वैशाली पुरी तर डान्स स्पर्धेत राजश्री साळुंखेची बाजी

कोकण कला व शिक्षण संस्थेचे आयोजन

*💫बांदा दि.२७-:* कोकण कला व शिक्षण विकास संस्था मुंबई आयोजित रॅम्प वॉक स्पर्धेत वैशाली पुरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्वाती नलावडे द्वितीय तर साक्षी घाडे हीने तृतीय क्रमांक पटकावला. डान्स स्पर्धेत राजश्री साळुंखे प्रथम, पूनम कांबळे द्वितीय तर प्रीती पांगे आणि समरीन पठाण यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. संस्था आयोजित इतर स्पर्धांमध्ये सुरज कदम, प्राजक्ता कदम, दर्शना कांबळे, नेहा वाकोडे, मुस्कान शाह हे विजेते ठरले. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली १० वर्षे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण अशा सर्वच क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांना स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करून संस्थेने दादर येथे ख्रिस्तमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रॅम्प वॉक, डान्स आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यात स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे परीक्षण सौ. प्रियांका काकडे आणि दयानंद कुबल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशांक सावंत, सचिन धोपट, विश्वनाथ बेटकर, नलिनी चव्हाण, श्वेता सावंत, सिंड्रेला जोसेफ, शरीफ टिंगरा, महेश जाधव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक – दिग्दर्शक अक्षय ओवळे यांनी तर आभार संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी मानले.

You cannot copy content of this page