*💫बांदा दि.२७-:* कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत बांदा कृषी मंडळाच्या वतीने मडूरा येथे कडधान्य पीक शेतीशाळा संपन्न झाली. मंडळ कृषी अधिकारी आर. ई. पापडे यांनी महिला बचतगटाच्या सदस्यांना कडधान्य शेतीबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच साक्षी तोरसकर, मंडळ कृषी अधिकारी आर. ई. पापडे, कृषी पर्यवेक्षक पी. एस. घाटगे, मडुरा कृषी सहाय्यक वाय. सी. सावंत, सातार्डा कृषी सहाय्यक एन. आर. ठाकरे, पाणलोट समिती सचिव प्रविण परब आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकात वाय. सी. सावंत यांनी कडधान्य पीक शेतीबाबत मार्गदर्शन केले. कडधान्य शेतीचे फायदे, घ्यावयाची काळजी, खते, किटकनाशक फवारणी, बाजारपेठ याबाबत माहिती दिली. यावेळी पर्यवेक्षक घाटगे यांनीही महिला शेतकर्यांना मार्गदर्शन केले. या शेतीशाळेसाठी ग्रामसंघ अध्यक्ष तन्वी परब, कोषाध्यक्ष अर्पिता मेस्त्री, कृषी सखी निकिता परब, सीआरपी प्रतिक्षा शेट्ये, अदिती जाधव, मयुरी नाईक, गौरी शेट्ये, साची मेस्त्री, अश्विनी परब, उज्वला परब, ज्योती शेर्लेकर, रेश्मा परब, रुक्मिणी भोगले, नयना परब, आरती परब, सावित्री पोखरे आदी महिला सदस्या उपस्थित होते.
मडूरेत कडधान्य पीक शेतीशाळा संपन्न
