जिवंत मासे विक्री वाहन ‘मत्स्यकन्या’ चे २८ डिसेंबर रोजी उदघाटन

कोंकण कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते उदघाटन

*💫मालवण दि.२७-:* कोकणातील मत्स्य शेतकरी, मच्छीमार यांना त्यांच्या मत्स्य उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी नीलक्रांति संस्थेचा अभिनव उपक्रम. कोकणात पहिल्यांदाच जिवंत मासे विक्री वाहन ‘मत्स्यकन्या’ चे उद्घाटन दि.२८ डिसेंबर २०२० सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास नीलक्रांति संस्थेच्या कोळंब, मालवण येथील केंद्रावर कोंकण कृषी विद्यापीठ चे कुलगुरू डॉ.संजय सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी राज्य मंत्री आम. रवींद्र चव्हाण , मत्स्यविद्याशाखाचे अधिष्ठाता डाॅ. प्रकाश शिनगारे, रत्नागिरी जिल्हा बँक संचालक श्री.अतुल काळसेकर.राष्ट्रीय मत्स्य विकास महामंडळ चे संचालक श्री. व्हिक्टर दांटस,मत्स्य कार्यालय चे सहायक आयुक्त श्री.नागनाथ भादुले, मत्स्यतंत्र पदविका विद्यालय शिरगांव,रत्नागिरी चे. प्राचार्य डॉ.मंगेश शिरधनकर,मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे मत्स्य शास्त्रज्ञ डॉ.नितीन सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तसेच मत्स्यपालन क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती यांचा गौरव होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नीलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्था,मालवणचे अध्यक्ष श्री.रविकिरण तोरसकर यांनी केले आहे

You cannot copy content of this page