भाजप विरुद्ध सेना अशी होणार लढत:दोन्ही पक्षश्रेष्ठींना प्रतिष्ठेची निवडणूक
*💫आंबोली दि.२७विष्णू चव्हाण-:* आंबोली ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे. भाजप विरुद्ध सेना अशी लढत होणार असुन ही निवडणूक दोन्ही पक्षश्रेष्ठींना प्रतिष्ठेची होणार आहे. तर मतदार नाराज आहेत. आंबोली जमीन प्रश्न प्रलंबित आहे. दहा दिवसात माजीमंत्री यांनी आश्वासन दिले होते. आज दोन महिने झाले तरी कोण नाव घेत नाही आहे. भाजपचा हाच प्रचार मुद्दा आहे. प्रश्न भाजपने अंतीम टप्प्यात आणला असताना मध्ये खो घालून हा प्रश्न प्रलंबित ठेवला, हाच मुद्दा घेऊन भाजपला हि ग्रामपंचायत खेचून घ्यायची आहे. माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांचे विश्वासु समर्थक सेनेला सुरुंग लाऊन निवडणूकीच्या तोंडावर बाहेर पडतो हिचया निकालाची नांदी आहे. सेनेचे सरपंच यांचा राजीनामा कोणत्या कारणांमुळे झाला हा हि मुद्दा भाजपला असल्याने या निवडणुकीत भाजपला चांगली संधी आहे. शिवसेनेने पाचवर्षे ग्रामपंचायत चालवली आहे. कोणती विकासकामे केली, या विकासकामांचा मुद्दा घेऊन मतदारांच्या समोर पुन्हा जायाचे आहे. मतदार पुन्हा सेनेला निवडून देणार कि नाकारणार हे निकाला दिवशी समजणार आहे.
